नागपूर ग्रामीण: वाडी पोलिसांची मोठी कारवाई: दोन दुचाकी चोरट्यास अटक, १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
वाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौशल्याने तपास चक्रे फिरवून दोन गुन्हे उघडकीस आणले असून, एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १,२०,००० रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. अटकेतील आरोपीचे नाव आदर्श उर्फ अमोल सदानंद मेश्राम असे सांगण्यात आले. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या संशयावरून आरोपीची तांत्रिक आणि सखोल चौकशी केली असता हे चोरीचे गुन्हे उघड झाले.