परभणी: जिल्हा मध्यवर्ती बँक नोकरभरती घोटाळा; सहकारमंत्र्यांचे चौकशीचे आदेश :आ.राजेश विटेकर यांची विधानसभेत लक्षवेधी
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती व कर्ज वाटपात झालेल्या आर्थिक गैर व्यवहाराची चौकशी करण्यासंदर्भात आज हिवाळी अधिवेशनात आमदार राजेश विटेकर यांनी लक्षवेधी मांडली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी या नोकर भरती व कर्ज वाटपात झालेल्या गैरव्यवहारात जो कोणी जबाबदार असेल त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासित केले.