जालना: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू, तिघे जखमी; जखमीवर उपचार सुरु
Jalna, Jalna | Jun 23, 2026 समृद्धी महामार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुले आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले. मंगळवार दि. 23 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा परिसरात मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेल क्रमांक 326 जवळ घडला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी फॉर्च्युनर (क्र. एमएच 20 एचएन 6768) भरधाव वेगात असताना समोरून जात असलेल्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरला धडकला.