नागपूर ग्रामीण: वाडी पोलिसांकडून घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान एका संशयित इसमाला अटक करण्यात आली आहे. ८ मे रोजी रात्री 8वाजेच्या सुमारास, अमरावती-नागपूर रोडवरील एल.बी. देशी बारजवळ पोलिसांनी एका संशयिताचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.आरोपी रविकुमार रामसखा दहिया असे सांगन्यात आले.आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे १०० रुपये किमतीचा लोखंडी चाकू मिळून आला. मनाई आदेशाचे उल्लंघन आणि घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीवर वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.