कळमनूरी: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू,तोंडापूर शिवारातील घटना
कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील किरण उर्फ रिंकू बाळू शिखरे व 19 वर्षे हा दिनांक 12 ऑक्टोबर रविवारी आपल्या दुचाकी वरून तोंडापूर येथून वारंगा कडे आपल्या आजोबाला घेण्यासाठी जात असताना त्यास अज्ञात वाहनांने जोराची धडक दिली आहे या अपघातात तो गंभीर जखमी झाला असता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार दाखल केली असता त्या मृत घोषित केले आहे .याप्रकरणी आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत पोलिसात कुठल्याही गुन्ह्याची नोंद घेण्यात आली नव्हती .