कपिल नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे यांनी 26 ऑक्टोबरला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, राजेश ओरेकर यांच्या कारची ऑटोला धडक लागली. त्यामध्ये ऑटोचे नुकसान झाले. यावरूनच आरोपींनी राजेश यांना मारहाण केली जात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे यांनी दिली आहे