मिरज: सांगलीत तीन दशकांची परंपरा असलेल्या दुर्गा दौडीला सुरवात,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून आयोजन,आज पहिली दौड संपन्न
Miraj, Sangli | Sep 22, 2025 शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी होणारी सांगलीची दुर्गामाता दौड केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातही साजरी केली जाते. सांगलीत 1985 पासून सुरु झालेल्या या दौडीची परंपरा यंदा ही सुरू असून आज घटस्थापनेच्या दिवशी ही दुर्गा दौड घेण्यात आली शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी 1985 साली तरुणांचे संघटन करण्याच्या उद्देशाने सांगलीत दुर्गामाता दौडीची सुरुवात केली. याचा उद्देश केवळ तरुणांचे संघटन असाही नव्हता तर नवरात्रीत देवीला धावत जाऊन तिचे दर्शन घ्यायचे