विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून विना परवाना अवैधरित्या वाळूची वाहतुक करणाऱ्यावर रायसोनी नगरात रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता कारवाई केली. त्यांच्याजवळून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.