उमरखेड: ग्रामपातळीवर रिपब्लिकन युवा सेनेची संघटनात्मक बांधणी ; टाकळी, निंगनुर, पिरंजी शाखा अध्यक्षांची नियुक्ती
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांचा रिपब्लिकन युवा सेनेमध्ये वाढता सहभाग पाहता तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके यांच्या प्रमुख उपस्तिथित टाकळी, निंगनूर, पिरंजी येथील अनेक कार्यकर्त्यांचा जिल्हा संपर्क कार्यालय उमरखेड येथे पक्ष प्रवेश करण्यात आला.