पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, युनिट ५ व युनिट ६ यांनी मांजरी येथील सराफ दुकानातील दरोड्याचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत मोठी कामगिरी केली आहे.या कारवाईत ३ आरोपींना अटक करण्यात आली असून ३ विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच दरोड्यातील सोने व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.