स्त्रियांच्या देहव्यापारासह मानवी तस्करी रोखण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) भंडारा शहरालगतच्या मौजा बेला परिसरात सुरू असलेले मोठे वेश्याव्यवसाय रॅकेट उध्वस्त केले. गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव पुंजरवाड आणि पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली दि. २० नोव्हेंबर रोजी ही संयुक्त कारवाई करण्यात आली. पथकाने सापळा रचून केलेल्या छाप्यात एका महिला आरोपीसह चार पुरुष आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले.....