तुमसर: देवसर्रा येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ शेळ्या ठार, पशुपालकाचे मोठे नुकसान
तुमसर तालुक्यातील देवसर्रा येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची घटना आज दि. 2 डिसेंबर रोज मंगळवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. पिंटू जंगलु साखरे रा. देवसर्रा असे पशुपालकाचे नाव असून त्यांच्या मालकीच्या शेळ्या चराईसाठी गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तीन शेळ्यावर हल्ला चढवून ठार केले. तर एक शेळीला फरपटत झुडपात नेले. या घटनेत पशुपालकाचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त पशुपालकाला वन विभागाने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.