केज: केज पोलीस ठाणे हद्दीत बचत गटाच्या महिलांचे 16 लाख रुपये अधिकाऱ्यानेच हडप केले, गुन्हा दाखल
Kaij, Beed | Oct 31, 2025 महिला बचत गट अत्यंत विश्वासाने आणि कष्टाने गोळा केलेले हप्ते वेळेवर भरत असताना, अरबाज पठाणने मात्र या पैशांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केली. केज येथील कंपनीचे शाखाधिकारी श्रीहरी मुळे यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून, क्षेत्रीय अधिकारी अरबाज रशीदखाँ पठाण याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (कलम ४०६, ४२०) नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.