मोताळा: शहरातील महावितरण कार्यालयाला आमदार संजय गायकवाड यांनी दिली भेट
मोताळा तालुक्यातील सात गावांतील शेतकरी बांधवांवर महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे अन्याय ओढवला होता. मेहनतीच्या पैशाने वीजबिलाची रक्कम भरल्यानंतरही ती जमा न झाल्याने या गावांतील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ आली आणि मोठा दंड आकारला जाणार होता.या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच आज 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा महावितरण कार्यालयाला भेट दिली.