जालना: प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्साहात प्रारंभ; शिवसेनेच्या नगरसेवकांचा पुढाकार
Jalna, Jalna | Jun 28, 2026 जालना : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात लसीकरण मोहिम राबविण्यात आली. शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या नगरसेविका दर्शनाताई खोतकर-झोल तसेच नगरसेवक अमोल ठाकूर, किशोर पांगाकर आणि निखिल पगारे यांनी मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष पुढाकार घेतला. भागोदय नगर, यशवंत नगर, म्हाडा कॉलनीसह प्रभागातील सर्व परिसरात पल्स पोलिओ मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आली. प्रभागातील एकही ० ते ५ वर्षे वयोगटातील बालक पोलिओच्या