विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या नागपूरच्या जामठा व्ही सी ए स्टेडियमवर २१ जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हायव्होल्टेज टी-२० सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी आज न्यूझीलंडचा संघ नागपूर विमानतळावर दाखल झाला. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी नागपूरकरांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती.न्यूझीलंडचा संघ जसा विमानतळाबाहेर आला, तसा चाहत्यांनी एकच जल्लोष केला.