हातकणंगले: चालू वर्षासाठीची एफआरपी जाहीर करावी मोटरसायकल रॅलीने निवेदन देणार, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे
यावर्षीचा ऊस गळीत हंगाम लवकरच सुरू होणार असताना,गेल्या वर्षी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना केवळ एफआरपी देऊन बोळवण केली आहे.अद्यापही मागील हप्त्याची रक्कम देण्यात आलेली नाही.त्यामुळे चालू गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी, मागील वर्षीचा हप्ता अदा करून चालू वर्षासाठीची एफआरपी जाहीर करावी,या प्रमुख मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून,हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांना निवेदन देणार आहे.