बार्शीटाकळी: मा.कृषिमंत्री शरद पवार उद्या दौऱ्यावर,कान्हेरी सरप येथे संवाद तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन येथे पुतळ्याचे उद्घाटन
माजी कृषिमंत्री शरद पवार उद्या अकोला दौऱ्यावर असून सकाळी दहा वाजता कान्हेरी सरप येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे, कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेणार आहे. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाच्या उद्घाटन समारंभाकरिता दुपारी एक वाजता ते उपस्थित राहणार आहे दोन्ही ठिकाणी त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार असणार आहे.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भावनाच्या उद्घाटन समारंभात भीमराव आंबेडकर सुद्धा उपस्थित राहणार आहे.