पुणे शहर: लोणी काळभोर येथे पुणे सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा अपघात
Pune City, Pune | Oct 29, 2025 पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा, कंटेनर व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील व्यंकटेश जॉयनेस्ट या सोसायटीच्या समोर घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील बाप व मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना नागरिकांनी उचलून लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.