मारेगाव: मजुरीच्या पैशांवरून तरुणावर हल्ला, वनोजा देवी येथील घटना मारेगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल
मजुरीच्या पैशाच्या वादातून तरुणावर हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी गावातील पंचशील चौकात घडली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.