भंडारा जिल्ह्यातील सनफ्लॅग कंपनीत क्रेन ऑपरेटर पदावर कार्यरत असलेल्या मारोती महादेव भिवगडे (वय ४५, रा. पाचगाव) यांचा १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कामावर असताना ७० फूट उंचावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील एकमेव कमावता आधार गेल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून दुपारी १ वाजेच्या सुमारास मृतदेह सनफ्लॅग कंपनीच्या मुख्य गेटसमोर ठेवून तीव्र आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलकांनी एक कोटी रुपये नुकसान भरपाई आणि कुटुंबातील दोन सदस्