श्रीगोंदा–सिद्धटेक मार्गावर मोठा अनर्थ टळला; श्रीगोंदा आगाराच्या बसला आग, प्रवासी सुखरूप श्रीगोंदा आगाराची श्रीगोंदा–सिद्धटेक मार्गे अहिल्यानगरकडे जाणारी एसटी बस कर्जत परिसरात असताना आज सकाळी अचानक बसच्या इंजिनमधून धूर निघू लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, यावेळी स्थानिक युवकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. धूर निघत असल्याचे लक्षात येताच युवकांनी तत्काळ चालकाला सूचना देत बस थांबवण्यास सांगितले. काही क्षणातच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.