गंगापूर: गंगापूर-छत्रपती संभाजी नगर रोडवरील गुरु धानोरा येथे दुर्दैवी घटना; गोमातेचा जीव वाचवताना तरुणाचा बुडून मृत्यू
आज सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर-छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील गुरु धानोरा गावाजवळ एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या गोमातेला वाचवण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. राजू भानुदास भोसले (वय २३, रा. गुरु धानोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.