शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तटकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत दळवी यांनी त्यांना थेट इशारा दिला असून, राज्याच्या राजकारणात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करताना, "मी चौथा बॉम्ब असा फोडणार आहे ना की ते रोहा सोडून मला असं वाटतं महाराज सोडून विदेशात पडतील एवढं नक्की आहे," असे अत्यंत गंभीर विधान केले आहे.