अंगावर आले तर शिंगावर घ्या, ओबीसींची वज्रमुठ दाखवून द्या; धनंजय मुंडेंचे आवाहन मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण त्यांना वेगळं आरक्षण द्या. आमच्या हक्काचं आरक्षण देणार असाल तर त्याला आम्ही विरोध करणार असं वक्तव्य माजी मुंडे यांनी केले आहे यापुढे ओबीसी आरक्षणाला लढा हा देशाचे नेते छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार. येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींची ताकद दाखवून द्या असं आवाहनही त्यांनी केलं.