गोंडपिपरी तालुक्यात विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त करून येथील तहसील कार्यालय परिसरात ठेवण्यात आले होते. यातील ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री चोरून नेले. दरम्यान, महसूल पथकाने पाठलाग करताना हा ट्रॅक्टर उलटल्याने चालक फरार झाला. ही धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली.