अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, 17 ते 21 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या तपासणीत 11 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत ५.५ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण झाली. यात ३,९९६ संशयित रुग्ण आढळले असून 11 जणांमध्ये कुष्ठरोगाची पुष्टी झाली आहे. सर्व रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू असून जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 150 झाली आहे. गावपातळीवर 1042 पथके जनजागृती आणि तपासणीचे काम वेगाने करत आह