सावंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते दीड वाजताच्या सुमारास भरधाव व निष्काळजी पणे ट्रॅक्टर चालवत ट्रॅक्टर चालकाने सालोड येथील आरटीओ कार्यालय जवळ प्रकाश पात्रे नामक इसमाला धडक दिली या धडकेत प्रकाश पात्रे यांचा मृत्यू झाला,अशी तक्रार फिर्यादी यांनी सावंगी पोलिसात दिली आहे.पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.