सेनगाव: माजी आमदार गोरेगांवकर यांनी खुडज येथे भेट देऊन कुंडलिकराव झाडे यांच्या तब्येतीची केली विचारपूस
हिंगोली विधानसभेचे माजी आमदार तथा शिवसेना नेते भाऊराव पाटील गोरेगांवकर यांनी आज खुडज या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. तसेच याप्रसंगी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगा़वकर यांनी कुंडलिकराव झाडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सेनगांव पंचायत समितीचे माजी सभापती गजानन पोहकर,शिवसेनेचे युवा नेते रणजीत पाटील गोरेगावकर, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच कुंडलिकराव झाडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.