जालना: घरासमोर पत्त्यांचा डाव खेळण्यास विरोध; शेतकर्याला काठीने मारहाण; माळशेंद्रा गावातील घटना; चौघांविरुद्ध तक्रार दाखल
Jalna, Jalna | May 6, 2026 घरासमोर पत्त्यांचा डाव खेळण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका शेतकर्याला काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील माळशेंद्रा येथे घडली. बुधवार दि. 6 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.सखाराम रामअप्पा घुले रा.माळशेंद्रा,ता.जि.जालना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,घुले यांनी त्यांच्या घराशेजारी पत्त्यांचा डाव खेळू नये, कारण तेथे येणारे लोक घराकडे तोंड करून लघुशंका करतात.