चोपडा: चुंचाळे येथे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने खळबळ,यावल पोलिसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 22, 2025 चुंचाळे गावात विलास भावलाल पाटील यांच्या प्लॉट क्रमांक १९२ मध्ये मोकळ्या जागेत एक स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. तातडीने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मयत अर्भक यावल ग्रामीण भागात नेले तर याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.