वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात आज दि 16 ऑक्टोबर 12 वाजता शेतकरी भवन येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर दृढ विश्वास व्यक्त केला. नव्या कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात आ. देवतळे स्वागत करताना जनतेच्या विकासासाठी आणि संघटन बळकटीसाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.