औंढा नागनाथ: जवळाबाजार शिवारात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्यास वाळू माफियाने ट्रॅक्टरने उडवले; तलाठी गंभीर जखमी
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार शिवारात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या महसूल पथकातील एका तलाठ्यास वाहनाचा पाठलाग करताना वाळूमाफियाने ट्रॅक्टरने उडवल्याची घटना दिनांक 3 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पुरजळ-जवळा बाजार रोडवर घडली आहे. यामध्ये तलाठी गंभीर जखमी असून मल्लिकार्जुन कापसे असे गंभीर जखमी झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. त्यांच्यावर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत