महाड: माकडांच्या हल्ल्यात वयोवृद्ध जखमी
बेबलघर परिसरात माकडांचा धुमाकूळ; नागरिक भयभीत
Mahad, Raigad | Nov 13, 2025 महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बेबलघर गावात माकडांच्या हल्ल्यात ८१ वर्षीय वयोवृद्ध जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. जखमी नारायण चिबडे यांच्यावर चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.