मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान ग्रामपंचायत रावणवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संविधानाची उद्देशिका देण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रमदानातून रावणवाडी संपूर्ण गाव आणि अंबामाता देवस्थान परिसरात स्वच्छता करण्यात आली, तसेच प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष कविता जगदिश उके, सरपंच ओमकांता पंधरे, उपसरपंच सूर्यभान सिडाम,