चांदूरबाजार तालुक्यातील सक्षमअंगणवाडी परसबाग योजने अंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या खात्यात वर्गकरण्यात आलेल्या निधीच्या गैरवापरा संदर्भात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून त्या संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी चांदूरबाजार तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख प्रदीप बंड यांनी केली आहे. त्याबाबतीत त्यांनी आज दिनांक 27 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी माध्यमाला दिलेली माहिती. चौकशी करून कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे