नागपूर ग्रामीण: काटोल रोडवरील भंगार गोदामाला भीषण आग; ८ लाखांचे नुकसान
काटोल रोडवरील खडगाव रोड परिसरात असलेल्या एका प्लास्टिक आणि स्क्रॅप गोदामाला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत गोदामातील लाकूड, प्लास्टिक आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. ७ मे रोजी मध्यरात्री १:१५ च्या सुमारास त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्राला या आगीची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान वाहनसह घटनास्थळी रवाना झाले.