लोहा: रिसनगाव येथील ओबीसी समाजाच्या वतीने हलगी वाजवत मराठा समाजाचा संस्थाचालक असलेल्या शाळेतून टीसी काढण्याचा दिले अर्ज
Loha, Nanded | Sep 15, 2025 शुक्रवारी मराठा समाजाच्या वतीने रिसनगाव ता. लोहा येथील प्रा. धोंडे हे संस्थापक असलेल्या शाळेतून टीसी काढण्यासाठी अर्ज देण्यात आला होता याचे उत्तर देत आजरोजी दुपारी 2 च्या सुमारास रिसनगाव येथील ओबीसी पालकांनी हलगी वाजवत आपल्या पाल्यांची टीसी मराठा संस्थाचालक असलेल्या जय महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय रिसनगाव ह्या शाळेच्या मुख्याध्यापकास अर्ज देत ओबीसी विद्यार्थ्यांची टीसी देण्याची विंनती करत मराठा समाजाने जे कृत्य केले आहेत त्यास जश्यास तसे उत्तर दिले आहेत.