जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद
Beed, Beed | Nov 27, 2025 बीड जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन मागील ४-५ दिवसांपासून बंद आहे. कंपनीची थकबाकी असल्याने मशीन बंद असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे गंभीर रुग्णांना खाजगी सेंटरमध्ये ४-५ हजार रुपये देऊन स्कॅन करावे लागत असून गरीब रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या प्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रवक्ता नितीन सोनवणे यांनी आज गुरुवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली.ते