वाशिम: जिल्ह्यातील मानोरा येथील तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाचा मोर्चा.
Washim, Washim | Sep 17, 2025 वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाचा मोर्चा. वाशिम जिल्ह्यात एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने मानोरा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आल आहे. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी होणार आहेत. बंजारा समाजाच्या वतीने मानोरा तहसीलदार यांना निवेदन देऊन हैदराबाद गॅझेटनुसार एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.