शिरोळ: कुरुंदवाड शहर व परिसरात घटस्थापनेसाठी लागणाऱ्या पूजासाहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ गर्दीने फुलली
कुरुंदवाड शहर व परिसरात घटस्थापनेसाठी लागणाऱ्या पूजासाहित्याच्या खरेदीसाठी आज रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून कुरुंदवाडच्या मुख्य बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली.शहराबरोबरच ग्रामीण भागातील गावोगावचे भाविक नागरिक सकाळपासूनच बाजारपेठेत दाखल झाले होते.पारंपरिक नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच घराघरांत देवीच्या घटस्थापना विधीची तयारी सुरू असल्याने बाजारपेठेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.