वर्धा: धनगर समाजाला आरक्षण द्या व जालना येथील उपोषण सोडवा: सकल धनगर समाज जिल्ह्याची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
Wardha, Wardha | Sep 22, 2025 धनगर जमातीस अनुसूचित जमात (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी आणि जालना येथे सुरू असलेले उपोषण त्वरित सोडवण्यात यावे, अशी जोरदार मागणी सकल धनगर समाज वर्धा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी समाजबांधवांनी दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.