अंबड: अंबडमध्ये प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
अवैध गॅस साठेबाजांवर धडक कारवाई; १७ सिलेंडर जप्त, माफियांमध्ये खळबळ
Ambad, Jalna | Mar 18, 2026 अंबडमध्ये प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! अवैध गॅस साठेबाजांवर धडक कारवाई; १७ सिलेंडर जप्त, माफियांमध्ये खळबळ अंबड (जालना) — जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाने आज (१८ मार्च) अंबड शहरासह वाडीगोदरी फाटा आणि पाचोड टोल नाका परिसरात अक्षरशः धडक मोहीम राबवत अवैध गॅस साठेबाजांवर मोठा घाव घातला. अचानक टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल १७ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आल्याने काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या या कारवाईत प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.