अंजनडोह शिवारातील त्या महिलेच्या खून प्रकरणी ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपीला धानोरा परिसरातून केली अटक
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 1, 2025
आज शनिवार एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातून माहिती देण्यात आली की, 31 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता मयत कांताबाई अनिल सोमदे राहणार आडगाव सरक तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या महिलेचा गळा कापून खून करण्यात आला होता, याप्रकरणी ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपी मारुती नामदेव भुईगळ वय पन्नास वर्षे राहणार धानोरा तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर या आरोपीला अटक केली असून सदरील आरोपीने खून केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.