शिरोळ: कुंभोज बाजारपेठेच्या मागणीसाठी अमरण उपोषणास सुरुवात, दीपक चौकात ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांचे आंदोलन
कुंभोज ग्रामपंचायतच्या मालकीच्या गट क्रमांक 1903 मधील 4 हेक्टर 6 आर क्षेत्राच्या जमिनीतून अंदाजे 0.82 आर जमीन ही पूर्वीपासूनच पडसर व खुल्या अवस्थेत आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये सध्या गावाचा वापर सुरू असून, ही जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात असून फेरफार क्रमांक 53/19 नुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बाजार भरवण्यासाठी अधिकृतपणे उपलब्ध करण्यात आली आहे.तथापि,या जमिनीवर अद्याप ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष कब्जा मिळालेला नाही.