चांदूर रेल्वे: कवठा कडू येथे बसच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू
अमोल भानुदास सुखदेवे यांनी बस चालकाविरोधात चांदुर रेल्वे पोलिसात तक्रार दिली आहे. अमोल याची आई इंदिरा भानुदास सुखदेवे ही कवठा कडू बस स्टॉप येथे आली असता, बस क्रमांक एम एच 40 Y 5404 ही चांदुर रेल्वे येथे जाण्याकरिता कवठा करू बस स्टॉप वर आली तेव्हा प्रवासी चळत असताना अमोलची आई बस मध्ये चढण्याकरता जात असताना बस चालकाने बस निष्काळजीपणाने चालविले बसच्या समोरच्या चाकाखाली आल्याने सदर महिला जखमी झाली व तिचा मृत्यू झाला अशी तक्रार अमोल यांनी पोलिसात दिली आहे.