2 जानेवारीला दुपारी 5:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या नवीन घराच्या बांधकामाजवळ कचरा टाकण्यासाठी गेलेल्या ६३ वर्षीय वृद्ध महिलेला नागपूर महानगरपालिकेच्या कंत्राटदाराच्या ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तहसील पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतक महिलेचे नाव श्रीमती आशा बबन पोफरे असे सांगण्यात आले आहे. आरोपी ट्रकचालक विशाल टेंभुर्णे विरोधात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.