नागपूर ग्रामीण: LPG टंचाई आणि काळाबाजाराचा आरोप; संतप्त नागरिकांचा गॅस एजन्सीवर धडक मोर्चा
शहरात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बहादुरा येथील 'इझी होम अप्लायन्सेस' (HP गॅस) या एजन्सीच्या गोदामाला गेल्या ८ दिवसांपासून टाळे असल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांना ओटीपी येऊनही १५-२० दिवस सिलिंडर मिळत नसल्याने गॅसचा काळाबाजार होत असल्याचा आरोप केला जात आहे.