समुद्रपूर: संत ज्ञानेश्वरमाऊलीच्या जय घोषात दुमदुमली गिरड नगरी शोभायात्रेत २५ भजन मंडीळीनी नोदविला सहभाग:गाव झाले भक्तीत तल्लीन
गिरड: येथिल माऊलीधाम देवस्थान कमेटीच्या वतिने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा संत ज्ञानेश्वर माऊली व अवलिया संजीवनी समाधी महोत्सवाहचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस चाललेल्या या महोत्सवात रोज हरीभक्त पारायण सुरेखाताई गणेशराव तिखे आंळदी यांच्यासंचा द्वारे प्रवचन कीर्तनाच्या कार्यक्रमाने उपस्थित हजारो भाविक भक्तीत तल्लीन झाले होते.या वेळी उपस्थित श्रोत्यांना संबोधीत करतांना त्यांनी युवकाना व्यसना पासुन दुर वे असा उपदेश दिला.