समुद्रपूर: करुळ येथे बोंड अळीचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याने ६ एकरातील कपाशीच्या उभ्या पिकावर फिरविले रोटावेटर:५ लाखाचे नुकसान
समुद्रपूर:यंदा अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी अलेले सोयाबीनचे पिक गेले कापसाचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पावसाच्या प्रकोपातून वाचलेले कपाशीच्या पिकातून काही तरी पदरी पडेल अशी आशा असतांना आता कपाशीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने करूड येथील शेतकरी मल्लार साबळे यांनी आपल्या ६ एकरातील पिकावर रोटावेटर फिरवले आहे.यामध्ये त्यांचे जवळपास ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.